धुळे येथील व्यापाऱ्यास तीन चोरट्यांनी 85 हजारांस लुटले

कोपरगाव – झगडेफाटा ते सावळीविहीर रस्त्यावर मोटारसायकलवरील अज्ञात तीन चोरट्यांनी धुळे येथील व्यापाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून 85 हजारांस लुटल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची माहिती अशी, की यशवंत देवकर (वय 58 रा.धुळे) हे सावळीविहीरकडे जात असताना झगडे फाट्यानजीक अज्ञात तीन चोरटे मोटारसायकलवर आले. त्यांनी देवकर यांची गचांडी पकडली. त्यांना कट्टया (पिस्तुल) चा धाक दाखवून बॅग हिसकावून घेतली. देवकर यांच्या पॅंट व शर्टच्या खिशातील दहा हजार रुपये रोख दोन मोबाईल फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण 85 हजारांचा ऐवज घेऊन पलायन केले. या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)