धुम्रपान एक मोठे आव्हान…

भारतातील बहुतेक धूम्रपान करणा-यांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे धूम्रपान सोडणे. लोक धूम्रपान सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांना धूम्रपान सोडणे शक्‍य होत नाही. धूम्रपान करणारे लोक केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तणावाला अधिक बळी पडतात..

धूम्रपान करणाऱ्या लोकांची वर्तणूक ते न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत 200 टक्के अधिक अतिसंवेदनशील असते. एवढेच नाही तर धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तणावाला बळी पडण्याचे प्रमाण ते न करणाऱ्यांच्या तुलनेत 178 टक्के अधिक आहे. याशिवाय सतत झोपमोड होणे, अपुरी झोप, प्रेरणेचा अभाव, अति खाणे किंवा कमी खाणे आणि घरात किंवा कामाच्या ठिकाणी रागाचा उद्रेक या समस्याही धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आढळतात.

धूम्रपानाचे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव असूनही, 74 टक्के लोकांना धूम्रपान सोडणे खूप कठीण आहे असे वाटते. चारापैकी तीन जणांनी ते आजारी असतानाही धूम्रपान करतात असे सांगितले, तर दहापैकी आठजणांना झोपेतून उठल्या उठल्या धूम्रपानाची तीव्र इच्छा होते. चिंतेची बाब म्हणजे धूम्रपान करणाऱ्या पुरुषांपैकी 65 टक्के जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पाचपैकी चार जणांमध्ये कार्बन मोनोक्‍साइडचे प्रमाण धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आढळले. उच्च रक्तदाब आणि कार्बन मोनोक्‍साइडचा वाढलेला स्तर या दोहोंचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात.

तंबाखूच्या सेवनाने भारतात दरवर्षी नऊ लाख लोकांचे प्राण जातात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, तंबाखूने होणाऱ्या आजारांमुळे देशाला दरवर्षी 16 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसतो. त्यामुळेच अधिकाधिक धूम्रपान करणाऱ्यांना ते सोडण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान सोडण्याच्या शास्त्रीय पद्धतींना योग्य समुपदेशनाची जोड मिळणे भारतातील धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे आहे.

यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे धूम्रपान करणाऱ्या बहुतेक लोकांना धूम्रपानाचे परिणाम किती गंभीर आहेत याची जाणीव असते, तरीही ते धूम्रपान करत राहतात. त्यांना वाटते की, धूम्रपानामुळे त्यांच्यावरील ताण कमी होतो आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढते.
धूम्रपान करणारे लोक ते न करणा-यांच्या तुलनेत मानसिक तणावाला अधिक बळी पडतात.धूम्रपान करणाऱ्यांपैकी सुमारे 88 टक्के लोकांना ही सवय वयाच्या 24 व्या वर्षाच्या आत लागली आणि 55 टक्के लोकांनी धूम्रपानाला सुरुवात केवळ मजा म्हणून केली.

धूम्रपानाची सवय केवळ गंमत म्हणून सुरू होते व नंतर ती प्राणघातक होते. धूम्रपान करणारे ही सवय सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण बहुतेकांना सिगारेटपासून दूर राहणे कठीण जाते. त्यांच्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतो. प्रत्येक एचआर विभागाने याची दखल घेतली पाहिजे. तणाव आणि कामाचा वाढता भार या कारणांमुळे धूम्रपान सुरू होते. विरोधाभास म्हणजे, धूम्रपानामुळे तेवढयापुरते तणावमुक्त वाटत असले तरी याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम खूपच वाईट आहेत. प्रत्येक धूम्रपान करणाऱ्याने सिगारेट ओढताना याचा विचार केला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)