धुम्रपानावर बंदी नाही, तर हुक्काबंदी का? 

हायकोर्टात याचिका

मुंबई – राज्यभरात धुम्रपानावर बंदी नाही तर हुक्काबंदी का असा प्रश्‍न हुक्का पार्लरवरच्या बंदी विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका आज दखल करून घेतली. राज्य सरकारने यावर भुमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितल्याने मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी 17 डिसेबर निश्‍चित केली.

पुण्यातील कार्निव्हल रेस्टॉरंटच्यावतीने दिनेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हुक्काबंदी विरोधात याचिका दाखल केली आहे. यावेळी याचिकाकर्त्यांनी हुक्‍क्‍यात बिडी आणि सिगरेटपेक्षा कमी प्रमाणात निकोटीनचे सेवन होते. मात्र
तरीही सर्रास बिडी, सिगरेटची विक्री केली जाते. सिनेमागृह, मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, विमानतळ इत्यादी ठिकाणी स्मोकिंग झोन्स उपलब्ध करून दिलेली आहे. मग केवळ हुक्काबंदी का असा सवाल उपस्थित केला.

-Ads-

राज्य सरकारचा हा निर्णय हुक्का पार्लरचा व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय कारक आहे . असा आरोप केला. तसेच मुंबईतील कमला मिलमध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या जिवितहानीस केवळ हुक्का कारणीभूत नव्हता. त्याला इतर अनेक कारणे होती असा दावाही याचिकेत केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)