मधुमेहावरही उपयुक्त गुग्गुळ (भाग एक)

आयुर्वेदिक दुकानात “म्हशागुग्गुळ’ मिळते ते त्रिफळाचूर्णाच्या काढ्यात शिजवावे म्हणजे शुद्ध होतो. त्रिफळा काढा करताना बेहडा व आवळा प्रत्येकी 50 ग्रॅम घ्यावा, त्यात 1 लिटर पाणी घालावे व त्याचाएक चतुर्थांश काढा उरवावा. मग उतरून गाळून घ्यावा व त्यात पाव किलो गुग्गुळ शिजवावा. काढ्यात हा चांगला वितळल्यावर ढवळावा व सुकला म्हणजे शुद्ध झाला असे समजावे. अशा रीतीने शुद्ध केलेले गुग्गुळ आयुर्वेदीय औषधासाठी वापरतात.

वातहारक – हे अत्यंत वातहारक आहे. शुद्ध गुग्गुळ रोज घेतल्याने पोटातील वायू कमी होतो.

-Ads-

सांधेदुखीवर – शुद्‌ध गुग्गुळ 3 ग्रॅम गाईच्या तूपाबरोबर व 3 ग्रॅम मध याबरोबर घेतले असता सांधे दुखणे बरे होते.

अंगदुखीवर – जर अंग दुखत असेल तरी सुद्धा असेच वरीलप्रमाणे गुग्गुळ तयार करून घेतल्याने पूर्ण बरे वाटते.

मूळव्याधीवर – शुद्‌ध गुग्गुळ 3 ग्रॅम गाईच्या तूपाबरोबर व 3 ग्रॅम मध याबरोबर सांजसकाळ 3 ग्रॅम कोमट पाण्याबरोब घ्यावे. अर्श म्हणजे मूळव्याधी बरी होते. गुग्गुळ मूळव्याधीवर मोठे औषध आहे.

पोट फुगीवर – शुद्‌ध गुग्गुळ 3 ग्रॅम गाईच्या तूपाबरोबर व 3 ग्रॅम मध याबरोबर सांजसकाळ 3 ग्रॅम कोमट पाण्याबरोब घ्यावे.

सुजेवरही – सुजेवर गुग्गुळ अत्यंत उपयोगी आहे. 50 ग्रॅम कुळीथ किंवा हुलगे ठेचून त्याचा 1/2 लिटर पाण्यात एकअष्टमांश काढा करावा व गाळून त्यात एक ग्रॅम गुग्गुळ घालून प्यावे, त्याने सूज कमी होते.

आमवातावर – आमवात म्हणजे अंग सुजून अत्यंत ठणकते व शरीराची हालचाल बिलकुल करावीशी वाटत नाही, यावर गुग्गुळ हे मोठे औषध आहे. अंगठ्याएवढ्या गुळवेलीचा तुकडा व एक लहान सुंठीचे कुडे ठेचून या दोहोचा 1/2 लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा व तो गाळून त्यात एक ग्रॅम गुग्गुळ घालावे. हे औषध नित्य सांजसकाळ घ्यावे. एका आठवड्यात आमवाताने जड पडलेले शरीर हलके होते. अंग दुखण्याचे थांबून, शरीराला रिलॅक्‍स हलके वाटू लागते.आमवातातून बरे वाटू लागते.

गंडमाळा, गलग्रंथी या विकारांवर – गोरखमुंडी म्हणून बाजारात अक्कलकाऱ्यासारखी बोंडे विकत मिळत असतात. ती बोंडे 10 ग्रॅम घेऊन 1/2 लिटर पाण्यात अष्टमांश काढा काढा करावा व गाळून घेऊन त्यात 1 ग्रॅम गुग्गुळ घालून रोज घेत एक चमचा घेत जावे, चाळीस दिवसात गंडमाळा कमी होऊ लागतात. असे रोज सकाळी एक वेळ 3 महिने पोटात घेतले असता कसल्याही प्रकारच्या गंडमाळा खात्रीने बऱ्या होतात.

व्रण किंवा जखम बरी होण्यासाठी -गुग्गुळाचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्रिफळ्याच्या काढ्यामध्ये शुद्ध केलेले गुग्गुळ 1 ग्रॅम भिजेपर्यंत मध व 1 ग्रॅम तूप घालून पोटात घ्यावे म्हणजे व्रण लवकर बरा होतो.

मेद नाशक – आजकाल मेद वृद्धीची तक्रार अगदी लहानपणापासून सुरू होते.त्रिफळाच्या काढ्याबरोबर गुग्गुळ घेतल्याने मेद कमी होतो. कोणी कोणी मेदाने फुगलेले म्हणजे उगाच मोठे झालेले शरीर कमी करण्यासाठी शुुद्ध गुग्गुळ गोमुत्राबरोबर पितात. 50 ग्रॅम गोमुत्र, 1 ग्रॅम गुग्गुळ घालून रोज सकाळी एक वेळ प्याल्याने 21 दिवसात मेद झडतो, शरीर हलके होते, पण शक्ती मात्र कमी होत नाही. ह्याचा वरूनही उपयोग करतात.

उचकी लागली असता – उचकी जर काही केल्या थांबत नसेल तर गुग्गुळ पाण्यात उगाळून ते कोमट करून ज्याला उचकी लागली असेल त्याच्या छातीखाली दोन मोठे चमचे पोटाच्या सर्वांगावर जाडसर लेप द्यावा, या लेपाने उचकी ताबतोब थांबते. उचकी लागली असता व काही केल्या थांबत नसेल तर हा पाण्यात उगाळून ते ऊन करून घशाला लावल्याने उचकी लगेचच थांबते.

फोड गळू या विकारांवर – फोड, गळू फुनसी, उठाणू, सूज वगैरे विकारात तसेच शरीरावर कोणत्याही कारणाने ग्रंथी वाढून मस आली असेल तर मस आलेल्या जागेवर गुग्गुळ पाण्यात उगाळून ऊन करून लावल्याने फायदा होतो. सूज फोड वगैरे सर्व प्रकारच्या ग्रंथी बसतात किंवा फुटतात.

हाड मोडले असता – हाड मोडले असताही गुग्गुळाच्या लेपाने हाड सांधले जाते. अशावेळी गुग्गुळ पाण्यात जाड वाटावे. हा लेप हाड मोडल्याजागी नियमित लावावा. यामुळे कित्येकांची हाड नीट सांधून झाली अरहेत. लेप द्यावा व वर लाकडाची पट्टी बांधून ठेवावी, ते लवकर सोडू नये, म्हणजे बरोबर हाड सांधते.

 

सुजाता गानू

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)