धुमाकूळ घालणारी लगस टोळी तडीपार

धुमाकूळ घालणारी लगस टोळी तडीपार
दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
—————-
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25- संतोषनगर, कात्रज, अरण्येश्‍वर, एलआयसी कॉलनी, तावरे कॉलनी, सच्चाईमाता नगर आदी परिसरात दहशत घालणाऱ्या गणेश लगस टोळीस तडीपार करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातून त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
गणेश लक्ष्मण लगस (43, रा. कात्रज), गजानन शिवानंद स्वामी (29, रा. संतोषनगर), निखील दिनेश चव्हाण (23, रा. संतोषनगर), किरण संदीप वाडकर (25, रा. संतोषनगर), ऋषिकेश सिध्दार्थ नंदुरे (23, रा. संतोषनगर), विजय लक्ष्मण लगस ( 46, रा. तावरे कॉलनी), अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत. स्वारगेट, दत्तवाडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2000 पासून ही टोळी कार्यरत आहे. गणेश लगस याने ही टोळी तयार करून परिसरात दहशत पसरवली होती. घातक शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव करुन पैसे उकळणे, गणेशोत्सवाच्या काळात जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे आदी कृष्णकृत्ये ही टोळी करत होती. सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस हवालदार असगर सय्यद, पोलीस शिपाई कल्पेश बाबर यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्‍त परिमंडळ दोन डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे पाठवला होता. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, बेकायदेशीर जमाव जमवणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)