धुमस्टाईलने दागिने हिसकवणाऱ्या दोघांना बेड्या

तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत : राजगुरूनगरात पोलिसांची कारवाई

राजगुरूनगर- शहरात मोटार सायकलवरुन जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात शहरात सहा महिलांचे दागिने हिसाकावणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी धुमस्टाईलने पकडून मुसक्‍या आवळल्या. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विकास भाऊसाहेब गायकवाड (वय 37, रा. आळेफाटा, ता. जुन्नर), संदिप सुखदेव शिंदे (वय 25, रा.भोजपुरी, ता. संगमनेर, जिल्हा नगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गजानन टोम्पे म्हणाले की, शुक्रवारी दुपारी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बनकर आणि विकास पाटील गस्तीवर असताना संशायस्पद रित्या एक दुचाकी तिन्हेवाडी रस्त्याने क्रीडासंकुलाकडे जात असताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन अडवण्याचा प्रयत्न केला.

या पाठलागामध्ये चोरट्याची मोटार सायकल स्पिडबेक्ररवरुन घसरुन पडली मात्र, तरीही हे दोन्ही सराईत चोरटे गाडी सोडून परिसरातील बाजरीच्या पिकात जाऊन लपले. या घटनेची खबर पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांना मिळताच पोलीस ठाण्याचे उपस्थित अधिकारी आणि पोलिसांनी वेळ न घालवता बाजरी पिकांना ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने वेढा देऊन भर पिकात लपलेल्या दोन्ही आरोपींना जेरबंद करुन ताब्यात घेतले. पकडलेल्या चोराट्यांकडे असलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल (एमएच 17 बीएफ 4781) ही संगमनेर येथुन चोरुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर शहरात दागिने हिसकावण्याच्या घटना जेथे घडल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मोटार सायकलची पाठीमागे नंबर प्लेटवर क्रंमाक दादा असा दिसून आल्याने याच आरोपींनी दागिने हिसकावल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपींकडून सहा घटनांमधील दागिने एकूण 2 लाख 71 हजार रुपये आणि मोटार सायकल 30 हजार रुपये असा तीन लाख एक हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.पकडण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असली तरी तालुक्‍यासह,तालुक्‍याबाहेरील इतर पोलिस ठाण्यातंर्गत दागिने हिसकावण्यात आलेल्या घटना, दाखल गुन्ह्यांचा तपास करुन अनेक घटनांची उकल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • दागिने हिसकावणाऱ्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असला तरी महिलांनी बेसावध न राहता घातलेल्या दागिन्यांबाबत आपल्या आजबाजुला दक्षता नेहमीच बाळगावी,लग्न समारंभ आदि कार्यक्रमात परिसरात वावरताना अनोळखी व्यक्तीपासून सावध रहावे.
    – अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक, राजगुरूनगर पोलीस ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)