धावले सात हजार स्पर्धक

पिंपरी – रोटरी क्‍लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप-2019 या स्पर्धेत सुमारे सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदित्य आर याने एक तास सतरा सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

निगडी, प्राधिकरणातील सेक्‍टर 27 येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून रविवारी (दि. 13) सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या माध्यमातून निरामय आरोग्याचा संदेश देण्यात आला. स्पर्धेची सुरुवात सिस्का एलईडीचे उपाध्यक्ष अजय मेहरा व ब्रीज स्टोनचे कार्यकारी संचालक अजय सावेकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी रोटरी क्‍लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, अण्णारे बिरादार, सचिव जगमोहन सिंग, डिस्ट्रिक्‍टचे गव्हर्नर डॉ. शैलेश पालेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती झाल्या. दुसऱ्या टप्प्यात लहान मुलांच्या स्पर्धेला माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ यांनी झेंडा दाखविला. ही स्पर्धा 12 ते 14 आणि 14 ते 16 या दोन वयोगटात झाली. याशिवाय अन्य वयोगटातही स्पर्धा झाली. यामध्ये 5 किमीची स्पर्धा खुल्या वयोगटासाठी तर 2 किलो मीटरची धर्मादाय स्पर्धा उद्योग क्षेत्रासाठी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढील स्पर्धक ठरले विजेते – 21 किलोमीटर – 45 वर्षांपुढील (पुरुष) – प्रथम प्रदीप रॉय, द्वितीय दीपक ओ, तृतीय जिओ थॉमस (महिला) – प्रथम अंजली बालिंगे, द्वितीय लिलाम्मा अल्फोन्सो, तृतीय दुर्गा सिल. 21 किलोमीटर – 45 वर्षाच्या आतील (पुरूष) – प्रथम आदित्य आर, द्वितीय तानाजी नलावडे, तृतीय लक्ष्मण धायकर (महिला) – प्रथम विनया मालसुरे, द्वितीय रेश्‍मा केवटे व नयन किर्तक, तृतीय स्वाती अग्रवाल. 10 किलोमीटर – 45 वर्षांपुढील (पुरुष) – प्रथम विश्वास चौघुले, द्वितीय शामपद दास, तृतीय रमेश चिविकर. (महिला) – प्रथम निशा मंडळ, द्वितीय उषा पाटील, तृतीय आकांक्षा जागी हे विजेते ठरले. 10 किलोमीटर – 45 वर्षांच्या आतील (पुरुष) – प्रथम प्राज गायकवाड, द्वितीय दिनकर लिलके, तृतीय बालाजी माने (महिला) – प्रथम स्वाती उनावडे, द्वितीय वैष्णवी सावंत, तृतीय प्रियंका चावरकर तर कार्पोरेट निकाल – एनप्रो, जीई, ओर्लीकॅन ब्लेझर या कंपन्यांनी पारितोषिके पटकाविली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)