धावपटू सुहास आंब्राळेंचा सहकारमंत्र्यांकडून सत्कार

पाचगणी – महाबळेश्वर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी आणि उत्कृष्ट धावपटू सुहास आंब्राळे याचा सातारा जिल्हा माध्यवर्ती बॅंकेच्यावतीने नुकताच सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सहकार खात्यातील अष्टपैलू आणि उत्कृष्ट धावपटू सुहास आंब्राळे कनिष्ठ लिपिक महाबळेश्वर यांनी सातारा हिल मॅरॅथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूमध्ये तृतीय क्रमांक पटकावला याची दखल घेऊन सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी आंब्राळे यांचे विशेष कौतुक करून सत्काराचे नियोजन केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हा सत्कार समारंभ झाला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक आ. मकरंद पाटील, राजेंद्रशेठ राजपुरे व इतर संचालकांची उपस्थिती होती.

ना. देशमुख म्हणाले, सहकारात काम करताना आपल्या अंगच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणारे कर्मचारी कमी सापडतात. महाबळेश्वर तालुक्‍यातील कर्मचारी आंब्राळे यांनी आंतरराष्ट्रीय धावपटूनाही लाजवेल अशी धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचे नमूद केले. यावेळी सहकार खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.

आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, सभापती रुपालीताई राजपुरे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, सहकार बोर्डाचे संचालक महादेव दुधाणे, बाजार समितीचे संचालक संतोष आंब्राळे, दिलीप आंब्राळे, गणपतराव आंब्राळे, रोटरीचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)