धावत्या ट्रेनमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

तिरुअनंतपूरम : तामिळनाडूत नऊ वर्षांच्या मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी ५६ वर्षांच्या नराधमास अटक केली आहे. के पी प्रेम अनंत असे या नराधमाचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वर्षांची पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह तिरुअनंतपूरम – चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करत होती. प्रवासात प्रेम अनंत हा पीडित मुलीच्या बर्थजवळ येऊन बसला. पीडित मुलीचे आई- वडिल लोअर बर्थवर झोपले होते आणि पीडित मुलगी मिडल बर्थवर झोपली होती. या दरम्यान नराधमाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने आरडा-ओरडा केल्याने तिच्या आई- वडिलांना जाग आली. त्यांनी आणि अन्य प्रवाशांनी प्रेम अनंतला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. इरोड स्थानकात पोलिसांनी त्याला अटक केली.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)