धावडेवस्तीतील सात बांधकामांवर बुल्डोजर

– 5 हजार 980 चौरस फुट जागेतील बांधकामे भुईसपाट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी धावडे वस्ती येथील अनधिकृत बांधकामावर गुरुवारी (दि. 28) कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सात अनधिकृत आर.सी. सी. ची 5 हजार 980 चौरस फुट जागेतील बांधकामे पाडण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये अभिषेक घुले यांचे 516 चौरस फूट, नितीन सर्जे नितीन यांचे 538 चौरस फूट, सुभाष लांडगे यांचे 753 चौरस फूट, भास्कर शिंदे यांचे 527 चौरस फूट, अनिल श्रीवास्तव यांचे 516 चौरस फूट, कविता चासकर यांचे 1 हजार 452चौरस फूट, आणि बबिता तोत्रे 1678 चौरस फूट अशा एकूण 5 हजार 980 चौरस फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाईत एक उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, आठ बीट निरीक्षक, एक पोलीस निरिक्षक, 20 पोलीस कर्मचारी, दहा मजूर एक जे.सी.बी. पाच डंपर यांनी सहभाग घेतला. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी विना परवाना बांधकाम करु नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)