धार्मिक स्थळांवरील कारवाई गुंडाळली?

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून शहरातील रस्त्याच्या कडेला असलेला धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्यात आली आहे. या कारवाईत दुजाभाव करण्यासह चुकीच्या पद्धतीने ही कारवाई होत असल्याची जोरदार टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत प्रशासनावर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत अतिक्रमण विभागाने ही कारवाई थांबविल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत महापालिकेकडून मागील आठवड्यापासून अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने यापूर्वीच सर्वेक्षण केले होते. प्रामुख्याने कोणतीही मान्यता न घेता बांधलेली तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवर रात्रीच्या वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईवेळी आसपासच्या घरांना कड्या लावल्या जातात आणि गुपचूपणे ही कारवाई केली जाते. यावरून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. मात्र, प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवत ही कारवाई होणार असल्याचे थेट मुख्यसभेत स्पष्ट केले असले, तरी पोलीस बंदोबस्त आणि पंतप्रधान दौऱ्याचे कारण देत ही कारवाई काही दिवस थांबविण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)