त्रिशूर, केरळ: बकरी ईद देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र केरळ मध्ये पावसाने थैमान घातले असून तेथील मुस्लीम बांधवाना नमाज पठणासाठी जागा उपलब्ध नव्हती. केरळमध्ये नागरिकांच्या घरासोबत मंदिर, मशिद सुद्धा उद्वस्त झाले. त्यामुळे मुस्लिम बांधवाना नमाज पठणासाठी एक मंदिर खुले करण्यात आले. दरम्यान, ‘सर्व धर्म समभाव’चे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बकरी ईदच्या नमाज पठणासाठी त्रिशूर जिल्ह्यातील माला शहराजवळील ईरावतूरमध्ये पुरुपिलिकव रक्तेश्वरी मंदिराच्या अधिकाऱ्यांनी मंदिराचा एक हॉल खुला केला. मशिदी पाण्यात बुडाल्यामुळे मुस्लिम समाज नमाज पठण कुठे करावं म्हणून संभ्रमात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)