धार्मिक उत्सवात स्पिकरचा आवाज बंदच…

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा


बडगा उगारा अन्यथा कारवाईला सामारे जा


हायकोर्टाची राज्यसरकारला तंबी

मुंबई – धार्मिक सण उत्सव जवळ आले आहेत. ध्वनी प्रदुषणा संदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा. आवाजाचे प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घ्या. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा अवमानना कारवाईला समोरे जा. अशी तंबी उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिली.

न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या पुढे असे खपवून घेतले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारा, अन्यथा कारवाई केली जाईल असे बजावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍वभूमीवर आवाज फौंडेशन आणि ठाण्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरच्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न होणे आदी आरोप केले. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला ही समज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)