धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

नाशिक – एका तरूणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. किरण निकम असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना शहरातील अति संवेदनशील भाग असलेल्या फुलेनगर येथे घडली.

जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. वार वर्मी बसल्याने किरण निकमचा जागीच मृत्यू झाला. किरण निकमच्या हत्येनंतर त्याच्या समर्थकांची शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)