धारणकरांच्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार नाही – तुकाराम मुंढे

नाशिक – नाशिक महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळला आहे. धारणकर मार्च महिन्यापासून 45 दिवस सुट्टीवर होते, तसेच त्यांनी तणावाची कोणतीही तक्रार दिलेली नव्हती, असे स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिले.

संजय धारणकर यांनी गुरुवारी आत्महत्या करत आपण कामाच्या तणावामुळे जीवनयात्रा संपवत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली. विशेष म्हणजे दीर्घ रजेनंतर ते नुकतेच कामावर रुजू झाले होते. ते नसताना त्यांचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिलेला होता, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धारणकर यांच्यावर तणाव होता अशी कोणतीही माहिती किंवा तक्रार त्यांनी आजपर्यंत प्रशासनाकडे केलेली नाही. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत ते 45 दिवस सुट्टीवर होते. यादरम्यान अमरनाथ यात्रेलाही ते गेले होते. सुट्टीच्या काळात त्यांच्या कामाचा दुसऱ्याकडे चार्ज दिला होता. एवढे दिवस सुट्टीवर होते, त्यामुळे कामाचा ताण होता हे म्हणणेच चुकीचे आहे, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांपासून आपण कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची काम करण्याची क्षमता वाढावी त्यासाठी कार्यशाळाही घेत आहोत. नियमानुसार रोज 14 फाईलवर काम होणे अपेक्षित असते. पण धारणकरांकडे सहा ते सातच्यावर फाईल नव्हत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत याला प्रशासन जबाबदार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)