धारजाई फळभाजी मंडई संघटनेतर्फे महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप

धारजाई फळभाजी मंडई संघटनेतर्फे महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप
निगडी – सरकारने प्लॅस्टिक वापरावर बंदी केल्यामुळे रूपीनगर येथील धारजाई फळभाजी मंडई संघटनेच्या वतीने येथील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब काळोखे यांच्या पुढाकराने महिलांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी काळोखे म्हणाले की, प्लॅस्टिकच्या वापराने पर्यावरणाला मोठी हानी होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली आहेत. सर्वांनी या निर्णयास सहकार्य केले पाहिजे. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. सरकारने याबाबत निश्‍चित केलेली दंडाची रक्‍कम कमी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संघटनेचे सुधाकर सिरसट, सुखदेव म्हस्के, तुकाराम पाटील, राजू कांबळे, पैगंबर फकीर, नाना वारुडे, संभाजू तरवडे, फिरोज तांबोळी, मंगला पिसे, ,बाळासाहेब बनसोडे, अजित फुटाणे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)