धामणेरच्या शालिनी पवार यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

पक्क घर मिळालं अन्‌ जिंदगी स्थीर झाली ः शालिनी पवार

सातारा – पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले. उज्वला योजनेतून गॅस मिळाला अन्‌ स्वच्छता गृहासाठी अनुदान मिळाले त्यामुळे आम्हाला धामणेर येथे कायमचे आमच्या हक्काचे घर मिळाले अन जिंदगी स्थीर झाली अशी भावना कातकरी समाजाच्या शालिनी पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स रुम मधून धामणेर ता. कोरेगावच्या शालीनी शांताराम पवार, खोजेवाडी ता. साताऱ्याच्या बानुबी बादशाह मुलानी आणि शांताबाई कृष्णात मदने यांनी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण, शहरी ), रमाई आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपस्थित होते.

खोजेगावाच्या बानुबी बादशाह मुलानी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, घरात मी आणि माझा मुलगा दोघेच होतो. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणे शक्‍य नव्हते, प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मी आज संडास, गॅस असलेल्या पक्‍या घरात राहात आहे. माझा मुलगा शिकत असून या घरामुळे आम्ही दोघही खुप समाधानी आहोत. शांताबाई कृष्णात मदने यांनी आपण पूर्वी कच्या घरात राहत होतो. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्के घर मिळाले. आता मी माझे पती आणि दोन मुल अतिशय आनंदानी या घरात राहत असून या घरासाठी दीड लाख अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले.

राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 12 लाख घरांचे 2019 च्या अखेर पर्यंत नियोजन असून आता पर्यंत 6 लाख घरे बांधली आहेत. उर्वरित 6 लाख घरे यावर्षात पूर्ण होतील. घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. आता आम्ही 5 ब्रास पर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता देणार आहोत त्यामुळे हा प्रश्‍न सुटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)