धामणीत चंपाषष्ठीचा सण उत्साहात

मंचर- सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आंबेगाव तालुक्‍यातील धामणी गडावर चंपाषष्ठीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पारंपारिक पद्धतीने देवाच्या दारी जागरण व गोंधळ घालण्यासाठी तसेच देवकार्य करण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. येथील खंडोबा गडावर धार्मिक कुलाचारासाठी गावडेवाडी, मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव, लोणी परिसरासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. हिंदू धर्म कुलाचाराप्रमाणे जागरण गोंधळ घालण्यासाठी भाविकांनी गडावर सकाळपासूनच गर्दी केली होती. धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्‍वर वस्तीच्या ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी पाणी तसेच गडाकडे येणारे रस्ते उत्तम प्रतीचे असल्याने दिवसभरात सुमारे एक लाख भाविकांनी देवदर्शन घेतल्याची माहिती देवस्थान टस्टच्या वतीने देण्यात आली.
धामणी येथील खंडोबा देवाची मूर्ती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)