धामणटेक येथे बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

शिरूर-भीमाशंकर मार्गावर बसची दुचाकीला जोरदार धडक

दावडी- शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावर धामणटेक (ता खेड) येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वार बसच्या पुढील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर खेड पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसचे नुकसान झाले आहे.
दशरथ पांडुरंग शिंदे (रा कव्हाळा ठाकरवाडी-निमगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर बाळाजी मारूती जोगदंड (वय 29 रा. राक्षेवाडी, ता. खेड) या बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मयत शिंदे यांचा मामा काशिनाथ बाबु पडवळ यांनी फिर्याद दिली आहे. राजगुरुनगर आगाराची पाबळ -राजगुरूनगर (एमएच 07 सी 7099) ही एसटी बस पाबळच्याच्या दिशेने जात होती. तर धामणटेक येथे राजगुरूनगरच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वाराला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी बसने सुमारे 10 फुटापर्यंत मोटरसायकला फरफटत नेल्याने शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्याचे नाव उशीरापर्यंत समजू शकले नाही. पुढील तपास खेड पोलीस करीता आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)