धामणकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शेतकरी, महिला, सराफ व्यावसायिकांना घातलेला साडेचार कोटींचा गंडा

शिरवळ – खंडाळा तालुक्‍यातील व पुणे जिल्ह्यातील शेतकरी, महिला तसेच सराफ व्यवसायिक यांना 4 कोटी 7 लाख 42 हजारांना गंडा घालून फरार झालेल्या वैभव भास्कर धामणकर व निलम वैभव धामणकर यांचा अटकपुर्व जामिन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खंडाळा येथील वैभव ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी निलम धामणकर या दाम्पत्याने केसुर्डी ता. खंडाळा येथील दोन व परिंचे (ता. पुरंदर ) येथील तीन शेतकऱ्यांसह महिलांना सोन्याची बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय असून बनवेलली बिस्किटे आम्ही परदेशात पाठवतो व त्यापासून भरपूर फायदा होतो, अशी भूरळ घालत गंडा घालता होता. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून एमआयडीसी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचे मिळालेले पैसे दीड वर्षात दुप्पट होण्याच्या आशेपायी काहीजणांनी मिळून सुमारे 1 कोटी 29 लक्ष 50 हजार धनादेशाद्वारे दिले. दीड वर्ष झाल्यानंतर त्याची मुदत संपल्याने शेतकऱ्यांनी पैशाची मागणी सुरू केली. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

काहींना खात्यावर पैसे नसतानाही चेक दिले. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आणि त्यांनी खंडाळा पोलिसात धाव घेतली. फिर्याद दाखल झाल्याचे कळताच धामणकर पसार झाले. त्यांना शाधण्यासाठी पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. यानंतर पुणे येथे सराफ व्यवसाय करणाऱ्या महेंद्रकुमार कावेडिया व्यापाऱ्यांची 2 कोटी 75 लाख 24 हजार 500 रुपये, रतननचंद दालिचंद यांना 1 लाख 24 हजार 575 रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे तपासात उघड झाले होते. याबाबत संबधितांनी पुणे येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. तसेच सोन्याचे दागिने घडवून देतो, असे सांगत एक लाख रुपयांची, सोन्याचे दागिने भिशीतुन 43 हजारांची फसवणुक केल्याचीही तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, संशयितांनी 28 जानेवारी रोजी अटकपूर्व जामिनासाठी सातारा सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)