धान्य गोडाऊनसाठी कायमस्वरूपी जागा हवी

पुणे – शिवाजीनगर येथील शहर अन्नधान्य पुरवठा विभागाचे गोडाऊन फुरसुंगी येथील खासगी जागेत स्थलांतरित झाले आहे. स्थलांतर झाल्यापासून तीन वर्षांचे भाडे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) भरणार आहे. दरम्यान शहर अन्नधान्य पुरवठा विभागाने गोडाऊनच्या कायमस्वरूपी जागेसाठी उरुळी देवाची येथील पाच एकर शासकीय जमिनीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

मेट्रोच्या तिन्ही मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. त्याकरिता धान्य गोडाऊनच्या जागेत स्थानक प्रस्तावित करण्यात आले असल्याने धान्य गोडाऊनच्या जागेसाठी पुरवठा विभागाकडून अथक प्रयत्नानंतर फुरसुंगी येथील नऊ हजार चौरस फूट असलेल्या खासगी जागेत स्थलांतरीत करण्यात आले. महामेट्रोतर्फे जागेसंदर्भात तीन वर्षांचा करार करण्यात आला असून जागेचे भाडे महामेट्रो देणार आहे; परंतु, तीन वर्षांनंतर नव्याने जागेचा शोध, पुन्हा निविदा, दरासंदर्भात होणारी तडजोड अशा प्रक्रियेमध्ये बराचसा कालावधी जातो. तर, कायमस्वरूपाची जागा असल्यास महामेट्रो संबंधित ठिकाणी गोडाऊन बांधण्याचा खर्च करून देणार असल्याने शहर अन्नधान्य पुरवठा विभागाने उरळी देवाची येथील शासकीय जागेची पाहणी करून या जागेचा ताबा मिळावा म्हणून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

शहर अन्नधान्य पुरवठा विभागाने उरळी देवाची येथील सूचविलेली जागा गायरान आहे. तसेच उरुळी देवाची येथील काही भाग महानगरपालिका आणि हवेली तालुक्‍यात येत असल्याने दोन्ही विभागांना तत्काळ जमिनीची मोजणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महानगरपालिका आणि हवेली तहसिल या विभागांनी मोजणी करून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच जिल्हाप्रशासनाकडून हा अहवाल शासनाकडे नव्याने पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून अहवालाला मंजुरी प्राप्त होताच महामेट्रोला पत्रव्यवहार करून धान्य गोडाऊनचे उरुळी देवाची येथील जागेत कायमस्वरूपी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)