धानोरे शाळेतील पालक मेळावा उत्साहात

आळंदी- धानोरे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे आज (गुरुवारी) घेण्यात आलेला पालक मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी चाकण बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी व मरकळ केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कातोरे, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गावडे, पालक समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल गावडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब बाळासाहेब गावडे, मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, अंगणवाडी कार्यकर्त्या यशोदा गावडे, सुरेखा साबळे, बी. एस. होनगुरे यांच्यासह आशा स्वयंसेवक, शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेबाबत शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पी. आर. सोनवणे, आरोग्य सेवक एस. बी. केदारी, एन. एस. भुसारी यांनी विविध आजार, लसीकरण मोहीम, स्वच्छता व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. मरकळ केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कातोरे यांनी हात धुण्याचे पद्धत व आरोग्याच्या चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, पालक व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व त्या निराकरण करण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली शिंदे तर वैशाली सासवडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)