धानोरेतील “राठी’मध्ये उत्पादन, वेतनवाढ करार

चिंबळी- धानोरे येथील राठी ट्रान्सपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पुणे मजदूर संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच उत्पादन आणि वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदित राठी उपस्थित होते. नवीन करारानुसार कंपनीमध्ये कायम कामगारांचा पगार 12 हजार 500 वाढ झाली आहे. नवीन करारानुसार मिळणारे सर्व फायदे 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात येणार असुन हे पुढील तीन वर्षाकरिता देण्यात आले आहे. पहिल्या वर्षाकरिता 6500 तर दुसऱ्या वर्षाकरिता 2500 आणि व तिसऱ्या वर्षाकरिता ही 2500 व इतर वाढ 1000 अशी एकूण 25 हजार रुपये पगार वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांच्या कुटुंबीयांसाठी तीन लाखापर्यंत मेडिक्‍लेम पॉलिसी कव्हरेज, सर्व कायम कामगारांना वर्षाला दोन दिवसाची सहल, दरवर्षी 30 पगारी रजा ही या कराराची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या करारावर सोमवारी (दि. 25) कंपनीच्या वतीने ए. एम. राठी, डॉ. शिवाजी पडवळ, श्रीकुमार दंडापाणी, महेंद्र फणसे. देवेंद्र कोंबल, सुनिल मोरे यांनी सह्या केल्या आहेत. तर संघटनेच्या वतीने ऍड. उत्तरा जाकीर, रामचंद्र शरमाळे, विवेक कांबळे, एन. डी. पडवळ, एस. ए. शेख, आर. एम. बुर्डे, एस. एस. कदम, एस. ए. थोरवे, ए. एम. होटोळे, एस. एस. अटाळकर यांनी सह्या करून एकमताने वेतन वाढीचा करार मंजूर करण्यात आला असल्याने सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)