धानोरेच्या उपसरपंचपदी वैशाली गावडे

चिंबळी- धानोरे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उपसरपंच छाया गावडे यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता. या रिक्‍त जागेसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सुंदर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी वैशाली गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने वैशाली गावडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सुंदर गावडे व ग्रामसेवक आर. व्ही. मुलगे यांनी सांगतिले. यावेळी नऊ सदस्यापैकी आठ सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली गावडे यांचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)