धातू, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी 

मुंबई: चीन आणि अमेरीकेने व्यापारातील मतभेद कमी करणसाठी बोलणी करायचे ठरविले आहे. त्यामुळे जागतीक शेअर बाजारातून काही प्रमाणात सकारात्मक संदेश आले. त्यामुळे शुक्रवारी धातू, ग्राहक वस्तू, आणि बॅंकींग क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन निर्देशांक उंचावले. आज देशातील संस्थागत गुंतवणूकदार तुलनेने जास्त सक्रीय होते.
शुक्रवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 284 अंकानी म्हणजे 0.75 टक्‍क्‍यानी वाढून 37947 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85 अंकानी वाढून होऊन 11470 अंकावर बंद झाला. ही निफ्टीची विक्रमी पातळी आहे.
आजच्या खरेदीचे प्रमाण बरेच व्यापक होते. त्यामुळे ते आणि नैसर्गीक वायू क्षेत्र वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. या आठवड्यात रुपयाच्या अवमुल्यनामुळे शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती. तरीही आठवड्याच्या पातळीवर शेअर बाजार निर्देशांकात वाढ नोंदली गेली. या आठवड्यात 78 अंकानी तर निफ्टी 41 अंकानी म्हणजे 0.36 टक्‍क्‍यानी वाढला.
गेल्या चार आठवड्यापासून निर्देशांक वाढत आहेत. काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी पडत्या काळातही 133 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकाना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र चलन बाजारातील अस्थिरतेमुळे काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारानी 825 केटी रुपयाच्या शेअरची विक्री केल्याचे दिसून आले.
सेन्च्युरम मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे शेअर बाजार सल्लागार प्रमुख देवांग मेहता यांनी सांगीतले की, जागतीक वातावरण खराब आहे. त्याचबरोबर जागतीक जून बाजारात डॉलर वधारत आहे. मात्र भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदार तिकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास वाढला आहे. कारण भारतातील बहुतांश मोठया कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे खरेदी होऊन भारतीय निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. मोठ्या कंपन्याच्या शेअरचे भाव निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे चांगलेत वाढले आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार छोट्या कंपन्याच्या शेअरची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.94 टक्‍क्‍यानी तर स्मॉल कॅप 0.88 टक्‍क्‍यानी वाढला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)