धाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे 

संग्रहित छायाचित्र

बगदाद, गाझा, काबूल, त्रिपुली पर्यटकांची आकर्षण केंद्रे 

न्यूयॉर्क: युद्धपर्यटनाला जगात वेगाने प्रसिद्धी मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपन्या इराक, सोमालिया, सीरिया आणि इस्रायल यासारख्या संघर्ष क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी विशेष पॅकेज उपलब्ध करत आहेत. बगदाद, दमास्कस, मोगादिशू, गाझा, जोंगलेई, त्रिपोली, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, काबूल हे भाग या धाडसी पर्यटकासाठी आकर्षण केंद्र ठरत आहेत.

-Ads-

मागील एक दशकात युद्धपर्यटनाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विशेषकरून पाश्‍चिमात्य देशांमध्ये युद्धपर्यटन वेगाने जोर पकडू लागले आहे. लोक आता चित्रपटाच्या पडद्यावरून किंवा पुस्तकांमधून बाहेर पडत प्रत्यक्ष घडामोडी पाहू इच्छित आहेत. पर्यटकांनी आता युद्धक्षेत्राला भेट देण्याचे सत्र आरंभिले आहे.
पत्रकार ऍलन सोरेनसेन यांनी युद्धपर्यटनाशी संबंधित एक छायाचित्र ट्‌विट केले होते. हे छायाचित्र इस्रायलच्या स्डेरॉट शहराचे आहे. येथील एका टेकडीवर पर्यटक इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी पोहोचल्याचे यात दिसून येते. या टेकड्या युद्धपर्यटनासाठी प्रसिद्ध झाल्या असून त्यांना स्डेरॉट सिनेमा असे नाव देखील पडले आहे.

2014 पर्यंत 50 लाखांहून अधिक जणांनी या टेकड्यांवरून युद्धाचे दृश्‍य पाहिले आहे. या पर्यटकांमध्ये युवती तसेच वृद्धांचा देखील समावेश आहे. अशाप्रकारच्या पर्यटनासाठी 5 ते 14 दिवसांकरता तुम्हाला 3500 डॉलर्सपासून 20 हजार डॉलर्स खर्च करावे लागू शकतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)