धाडसी इटालीयन प्रवासी मार्कोपोलो

प्रवासी दुनियेत अनेक साहसी प्रवासी होऊन गेले. त्यापैकी मार्कोपोलो हे एक युरोपातील प्रमुख नाव. आज मार्कोपोलोचा जन्मदिन. मार्कोपोलोचा जन्म 15 सप्टेंबर 1254 मध्ये व्हेनिस येथे झाला. त्याकाळी हिंदुस्थान भेटीचे सर्वच प्रवासी लोकांना आकर्षण असे.वयाच्या 17 व्या वर्षी सन 1271 मधे अर्मेनियातील लाइआसुस बंदरातुन त्याने प्रवासास सुरवात केली व 24 वर्षांनी तो मायदेशी परतला.
चीनमधून रेशमी कापड खरेदी करून श्रीमंत होण्याचा त्याचा इरादा होता. भूमध्य समुद्र पार करून नंतर खुष्कीच्या मार्गाने इराक, इराण, कझाकिस्तान या सिल्क रुटने (जुना चीनला जाणेचा व्यापारी मार्ग) चीनला गेला. मंगोलियन सम्राट कुब्लाईखान याची पण त्याने भेट घेतली होती. तत्कालीन पोपने कुब्लाईखान खान याच्यासाठी भेटवस्तू दिल्या होत्या. त्याच्या सेवेत मार्को पोलो काही वर्ष राहिला होता. बीजिंगमधून ब्रह्मदेशमधील पेगन भागातही तो येऊन परत बीजिंगला गेला.चीनमधून समुद्रमार्गे परत येताना जावा -सुमात्रा येथे भेटी दिल्याचा त्याच्या प्रवासवर्णनात उल्लेख आहे.
सन 1292 मध्ये त्याने भारतात तामिळनाडूत तंजावर येथे प्रवेश केला.तेथील दरबारात राजासह सर्व अधिकारी जमिनीवर बसलेले पाहून मार्कोने राजाला विचारले, “आपण उच्चासनावर न बसता जमिनीवर का बसले आहात’ त्यावर  राजाने उत्तर दिले ‘पृथ्वीवरील जमिन बसायला पुरेशी आहे, कारण आपण पृथ्वीपासून बनवलेलो आहोत.’ ही गोष्ट मार्को पोलो यांनी आपल्या प्रख्यात ‘द ट्रॅव्हल्स’ या पुस्तकात नमूद केली आहे. त्याचवेळी मार्कोपोलो याने वारंगळच्या काकतीय राजवटीतील रुद्रम्मा देवीच्या काळात तेलंगणास भेट दिली होती. काकतीय राजवटीचा तो भरभराटीचा कालखंड होता.
तेथील लोकजीवनाबाबत नोंदी घेतल्या आहेत तेथील मंदिरे तसेच व्यापारा बद्दलही त्याने उल्लेख केले आहेत.मलबारमधील मसाल्याचे पदार्थ जंगलातील प्राणी यांचेही वर्णन केले आहे. केरळ मधील कालिकत बंदरासही त्याने भेट दिली होती तेथूनच तो परतीच्या प्रवासाला इराणपर्यंत समुद्र मार्गे तेथून कॉन्स्टंटीनोपल मार्गे 24 वर्षानंतर मायदेशी 24000 किलोमीटर प्रवास करून परत गेला. दि. 8 जानेवारी 1324 रोजी त्याचे निधन झाले.
या थोर यात्रेकरूस अभिवादन.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)