धांदरफळ बुद्रूक येथे विद्यालयाला टाळे

धांदरफळ बुद्रूक (ता. संगमनेर) : येथील मुख्याध्यापक, शिक्षकाची बदल रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देताना विद्यार्थी.

मुख्याध्यापक, शिक्षकाची बदली रद्दची मागणी : विद्यार्थी, पालक आक्रमक

संगमनेर – विद्यालयातील महिला शिक्षिकांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे चौकशीसाठी आलेल्या समितीने एकतर्फी बाजू ऐकून दिलेल्या निर्णयाप्रमाणे विद्यार्थीप्रिय शिक्षक व मुख्याध्यापकांची तडकाफडकी बदली झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. संतप्त विद्यार्थी व पालकांनी बुधवारी दि.1 पासून रयत शिक्षण संस्थेच्या मुरलीधर बापूजी वलवे लोकमान्य विद्यालयाला टाळे ठोकल्याने संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ बुद्रूक येथे खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बाबत अधिक माहिती अशी की, धांदरफळ बुद्रूक येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंत साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामापासून, शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत आग्रही असलेले तसेच ग्रामीण ढंगात शिकवण्याच्या विशिष्ट हातोटीमुळे विद्यार्थीप्रिय असलेले पर्यवेक्षक भास्कर कवडे व मुख्याध्यापक मच्छिंद्र सिनारे या दोन शिक्षकांबरोबर शिक्षक कमी असल्याने जादा तासिका घेण्याच्या कारणावरुन विद्यालयातील शिक्षिकांचे मतभेद आहेत.

दहावीच्या वर्गासाठी असलेला गुरुकुल प्रकल्प बंद असल्याबाबतची 17 जुलै रोजी झालेल्या शिक्षक पालक सभेत जोरदार चर्चा झाली होती. यात महिला शिक्षिका शिकवित नसल्याबद्दल पालकांनी आक्षेप घेतले होते. या सर्व घटनांमुळे विद्यालयाचे वातावरण कलुषित असतानाच, संख्येने जास्त असलेल्या महिला शिक्षिकांनी संस्थेच्या मॅनेजिंग काउंसिल सदस्या मीना जगधने यांच्याकडे संबंधित शिक्षक, पालक, व्यवस्थापनाविरुद्ध तक्रारी अर्ज दिला होता.

रयतच्या व्यवस्थापनाने या अर्जाच्या चौकशीसाठी पाठविलेल्या समितीने शिक्षकांची बाजू ऐकून न घेताच दिलेल्या अहवालामुळे बुधवारी (दि.1) रोजी दोन्ही शिक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अचानक झालेल्या बदलीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनाचा पावित्रा घेत, शाळा बंद केली. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पालक व ग्रामस्थ एकत्र आल्याने कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणा देत विद्यार्थ्यांनी गाव दणाणून सोडले.

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन

या प्रकरणाची चौकशी करण्यासठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी चारुलता भोसले यांना या शिक्षकांची अन्यायकारक बदली रद्द करणे व इतर तक्रारी संदर्भात विद्यार्थी व पालकांनी निवेदने देत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत विद्यालय सुरू होऊ न देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)