धांगवडी फाट्यावरील उड्डाणपुलाला विरोध नव्हता

कापुरहोळ- पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता. भोर) फाट्यावरील उड्डाणपुल उभारण्यासाठी माझा कधीही विरोध नव्हता व नाही. जर तो पुल झाला तर धांगवडीकरांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. विकास कामात मी कधीही राजकारण करीत नाही. उलट इंजिनियरींग कॉलेजला जाण्यासाठी त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे; परंतु उपोषणकर्ते तालुक्‍यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार थोपटे म्हणाले की, राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. तसेच महामार्ग ऍथोरीटी ही त्यांच्या नियोजनाप्रमाणे काम करीत असते. त्यांच्या कामात स्थानीक लोकप्रतिनिधी ढवळाढवळ करू शकत नाहीत. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आमच्यावर केलेले आरोप बिनबूडाचे व धादांत खोटे आहेत. मी व माझे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी कधीही धांगवडी फाट्यावर उड्डाणपुल होऊ नये असे पत्र संबंधीत कार्यालयाला दिले नाही. ज्यावेळी पुणे-सातारा महामार्गाच्या चौपदरणाच्या कामास सुरूवात झाली. त्यावेळी धांगवडी फाट्यावरील रस्त्यावर दुभाजक नव्हता. त्यावेळी सदर फाट्यावर दुभाजक व्हावा यासाठी माजी मंत्री थोपटे यांनी धांगवडी गावच्या हितासाठी दुभाजक व्हावा म्हणून पत्र दिले होते.
उपोषणकर्ते हे भाजप प्रणित असल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून धांगवडी फाट्यावरच उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यावेळी गडकरी यांनी फाट्यावरच पुल उभारण्याचे आश्‍वासन त्यांना दिले होते; तरीही ते माझ्यावरच खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत आहेत.

  • अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
    सामाजीक क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री अनंतराव थोपटे व माझ्याबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे. तसेच अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे धादांत खोटे आरोप करणाऱ्यावर लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
    आमदार संग्राम थोपटे, भोर-वेल्हा-मुळशी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)