धांगवडीत उड्डाणपुल उभारणीत राजकारण आडवे

  • जागा बदलण्याचा घाट; नागरिकांचे उपोषण
  • नागरिकांकडून 10 वर्षांपासून होत आहे मागणी

कापूरव्होळ – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्‍यातील धागवंडी गावांच्या फाट्यावर या दहा वर्षात 42 अपघात झाले. यामध्ये 14 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत, असे असतानाही राजकारणातून स्वहितासाठी चुकीच्या ठिकाणी उड्डाणपुल उभारला जात आहे. या कामाला विरोध करीत धांगवडी गावांच्या फाट्यावरच उड्डाणपुल व्हावा, यासह आठ मागण्यांसाठी सहा जणांनी बुधवारी (दि.14) पासून उपोषणास बसले आहेत. यामध्ये नागरिकांच्या, शेतकरी महिला व इतर गावातील नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे.
धांगवडी फाट्यावर उड्डाणपुल व्हावा यासाठी गेल्या 10 वर्षांपासून नागरिकांकडून सतत मागणी होत आहे. बोगदा तज्ञांकडूनही याबाबत पत्रक देण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण अधिकारी मात्र राजकीय दबावातून उड्डाणपुलाची जागा बदलून अन्य ठिकाणी पुल उभारण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. याकरिता पोलीस बळाचा वापर करून उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती परंतु, या प्रकरणातून उड्डाणपुलाच्या कामास तात्पुरती स्थगिती देऊन काम थांबविण्यात आले आहे.
महामार्गालगत असणालेल्या गावात 800 वर्षापूर्वीच्या अडबलनाथ मंदीर, शेतकरी व ग्रामस्थांचा विचार न करता स्वहितासाठी राजकीय दबाव आणून उड्डाणपुलाची जागा बदलली गेली आहे. अडबलनाथ मंदीर यात्रा उत्सावातील गाडेबगाड इतर कोणत्याही बाबीचा विचार न केल्याने 42 अपघातात 14 पेक्षा अधिक बळी गेले आहेत. ही बाब लक्षात घेवून या कामाला विरोध करण्याकरिता सागर दत्तात्रय तनपुरे, समीर रमेश घोडेकर, महादेव तनपुरे, निलेश जगन्नाथ तनपुरे, विठ्ठल व्हाणमाने, सतीश गणपत आडसुळ हे सहाजण उपोषणास बसले आहेत. भोर प्रांताधिकारी राजकुमार जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण अधिकारी निकम, गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्यासह जि.प.सदस्य शलाका कोंडे, भोर भाजपा अध्यक्ष गणेश निगडे, डोंगरी परिषद सदस्य विश्वास ननावरे, अमर बुदगुडे, शिवसेना युवाध्यक्ष अदित्य बोरगे, हमीद मुलाणी आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली असून धांगवडी फाट्यावरच पुल उभारण्याचे आश्वासन देऊन यासंदर्भातील पत्र देतो, असे राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण अधिकारी निकम यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)