धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवरील विजय : क्षीरसागर

बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा 76 मतांनी विजय झाला. मात्र धस यांना मिळालेली मतं कुठून आली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबतच्या फोटोवरून मिळू शकते. कारण विजयानंतर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरेश धस यांचा सत्कार करुन गुलाल खेळला. यातूनच सुरेश धस यांना पडलेली विक्रमी मतं कुठून आली, या उत्तरातली एक चुणूक दिसून येते.

विशेष म्हणजे या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की “सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील वर्षभरापासून नाराज आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना या दोन्ही नेत्यांची कायम अनुपस्थिती असते.

एकीकडे राष्ट्रवादीकडून पुतण्या संदीप क्षीरसागर यांना मिळणारं बळ तसंच बीडमध्ये धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांकडून क्षीरसागरविरोधी कृत्याला मिळणारं खतपाणी, यामुळेच जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)