धवलसिंह मोहिते पाटील गटाला उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या

अकलूज- सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाच्या काही सदस्यांविरोधात खोटे दाखले दिल्याची सबब पुढे करुन पद्मजादेवी मोहीते पाटिल, भानुदास सालगुडे पाटील व धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचे युवानेते धैर्यशिल मोहिते पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व बाबाराजे देशमुख यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका 22 नोव्हेंबर 2018 रोजी फेटाळण्यात आल्यामुळे विरोधकांच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यातच ओबीसी व ऊस उत्पादक गटातील सात उमेदवारांविरोधात दाखल केलेल्या याचीकाही फेटाळण्यात आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरम्यान, सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रीयेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड व न्यायमुर्ती श्रीयुत जमादार यांनी या सर्व याचिका फेटाळून लावल्या. या प्रक्रीयेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या बाजुने ऍड. दिलीप बनकर यांनी तर खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाकडून पुणे येथील ऍड. अभिजीत कुलकर्णी व ऍड. नितीन खराडे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)