धर्म रक्षणासाठी नव्हे विकासासाठी निवडून दिले – कन्हैया कुमार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला “अच्छे दिन’चे दाखवलेले स्वप्न भंग झाले आहे. जनतेने धर्माचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर सर्वांगिण विकासासाठी सरकार निवडून दिले आहे, असे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार म्हणाला. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने भ्रष्टचार कमी करू असे सांगितले होते. पण सत्तेत आल्यावर भ्रष्ट लोकांनाच त्यांनी पक्षात प्रवेश दिला, असा टोला लगावित नरेंद्र मोदी राफेल कराराची आकडेवारी का जाहीर करत नाही ? असा सवाल त्याने केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार म्हणाला, नोटाबंदीनंतर लघु उद्योग डबघाईला आले पण अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला भरघोस नफा मिळाला.

-Ads-

समाज अजूनही हॅशटॅगच्या मानसिकतेत अडकला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर एखाद्याने टीका करणे योग्य आहे, पण निधनाच्या दिवशीच असे करणे चुकीचे पण टीका करणाऱ्यांना मारहाण करणे देखील चुकीचेच आहे. घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे. सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. गौरी लंकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाला.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींकडून दाभोलकरांच्या आरोपींची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना अटक करण्याआधी घाईगडबडीत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कारवाई पाच वर्षांपूर्वी का नाही झाली? असा सवाल त्याने विचारला.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)