मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या मुलाचाही आत्मदहन करण्याचा इशारा

तर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा !

धुळे: संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यानंतर पाटील यांनी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

-Ads-

मात्र, मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.

नरेंद्र धर्मा पाटील आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच हे मंत्री जर स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,असे पत्रात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)