धर्मा पाटलांच्या मुलानेही दिला आत्मदहनाचा इशारा

धुळे – मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत.

-Ads-

याची जबाबदारी घेऊन या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
हे मंत्री जर स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर आपण या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे पत्र ई-मेलद्वारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई न झाल्यास माझ्याकडे आत्मदहर करण्याशिवाय पर्याय नाही. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री यांची राहील, असे नरेंद्र पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)