‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई

पुणे – खासगी रुग्णालयांमध्ये गरीबांना उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या नावापुढे “धर्मादाय’ हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे. त्याबाबत राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सर्व खासगी रुग्णालयांना आदेश दिले आहेत. मात्र,काहींकडून त्याचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे सोमवारपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादायक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

पुण्यात दीनानाथ मंगेशकर, रुबी, जहांगीर, पूना, नोबेल, सह्याद्री, संचेती, थेरगावचे आदित्य बिर्ला हॉस्पिटल आदी बड्या हॉस्पिटलसह 56 खासगी रुग्णालयांचा कारभार धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतो. सध्या खासगी हॉस्पिटलपैकी काही हॉस्पिटलना सरकारकडून विविध सवलती दिल्या जातात. त्या बदल्यात गरिबांवरील उपचार खर्चात सवलत देण्याचे आदेश यापूर्वीच हायकोर्टाने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या शहरातील खासगी हॉस्पिटलच्या नावामध्ये धर्मादाय या शब्दाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे सामान्य अथवा गरीब पेशंटना ही धर्मादाय अथवा खासगी हॉस्पिटल आहेत, हे लक्षात येत नाही. त्यासाठी हॉस्पिटलच्या नावापुढे धर्मादाय हा शब्दप्रयोग करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गरीब पेशंटना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे शक्‍य होईल. या आदेशाची अंमलबजावणी नऱ्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलने केली आहे. या संदर्भात हॉस्पिटल असोसिएशनची बैठक घेऊन त्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या नावापुढे धर्मादाय या शब्दाचा उल्लेख करण्याचे ठरवल्याचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.

राज्यातील 430 हॉस्पिटलना आदेश लागू
बैठकीनंतर पुणे शहरासह राज्यातील काही रुग्णालयांनी “धर्मादाय’ हा शब्द लावला आहे. मात्र, काहींकडून अद्याप आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्यातील 430 धर्मादाय हॉस्पिटलना हा आदेश लागू आहे. सांगली, सिंधुदुर्ग आणि भंडारा या जिल्ह्यांतील खासगी हॉस्पिटलने नावापुढे धर्मादाय हा शब्द लावला आहे. परंतु, पुणे शहरातील काही रुग्णालयांनी “धर्मादाय’ हा शब्द लावलेला नाही. त्यामुळे ज्या रुग्णालयांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही, त्यांवर येत्या सोमवारपासून कारवाई होणार असल्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)