धर्मादाय रूग्णालयांवर आयुक्त कार्यालयाची नजर

फलकामध्ये धर्मादाय शब्दाचा समावेश करण्याच्या सूचना

सातारा – धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत रूग्णालये निर्धन दुर्बल रूग्णांना कायदेशीर तरतूदीप्रमाणे सेवा देतात की नाही, याकडे आता धर्मादाय आयुक्त क ार्यालयाची करडी नजर राहणार आहे. तसेच नोंदणीकृत रूग्णालयांनी फलकामध्ये धर्मादाय अथवा चॅरीटी असा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वेगळ्या नावाने नोंदणी करून रूग्णालयांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या त्या रूग्णालयांच्या शोध मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे.

-Ads-

राज्यासह सातारा जिल्ह्यातील धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृृत अनेक रूग्णालयांनी फलकामध्ये धर्मादाय अथवा चॅरीटी असा शब्दाचा ठळकपणे समावेश केलेला नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी त्या रूग्णालयांनी रूग्णांना व नातेवाईकांना तात्काळ समजेल अशा धर्मादाय व चॅरीटेबल असा ठळक शब्दाचा समावेश क रण्याच्या सूचना कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आता निर्धन व दुर्बल रूग्णांना दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांनी कलम 41 नुसार घोषित केल्याप्रमाणे धर्मादाय नोंदणी रूग्णालयात निर्धन रूग्णांना मोफत व दुर्बल रूग्णांना निम्म्या रक्कमेत उपचार देणे बंधनकारक आहे. निर्धन रूग्णांचा निकष हा 85 हजार रूपये वार्षिक उत्पन्न व दुर्बल रूग्णांसाठी 1 लाख 60 हजार वार्षिक उत्पन्नाचे निकष ठरविण्यात आले आहेत. उपचार घे÷ताना दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड व तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला रूग्णालयात सादर करावा लागणार आहे. धर्मादाय कायद्यानुसार निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांच्या उपचारासाठी रू ग्णालयांना एकूण खाटा अथवा बेडपैकी 10 टक्केराखिव ठेवणे देखील बंधनकारक आहे.

सातारा जिल्ह्यात धर्मादाय नोंदणी असलेली एकूण 18 रूग्णालये आहेत. त्यापैकी 16 रूग्णालये सुरू आहेत. कराड येथील कृष्णा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटल ऍण्ड मेडीकल रिसर्च सेंटर, फलटण येथील कृष्णामाई मेडीकल ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, सातारा येथील आयुर्वेद प्रसारक मंडळ संचलित डॉ.मो.ना.आगाशे धमार्थ रूग्णालय व प्रसुतीगृह, फलटण येथील आरोग्य मंडळ संचलित श्रीमंत मालोजीराजे सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल, सातारा येथील कै.कृष्णा श्रीपती घोरपडे मेमोरियल फाऊंडेशन संचलित- निरामय हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, फलटण येथील लायन्स क्‍लब चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मुधोजी आय हॉस्पिटल, वाई येथील मराठी मिशन-मुंबई संचलित मिशन हॉस्पिटल, कराड येथील जी.के.गुजर मेमोरिअल चॅरीटेबल ट्रस्ट कराड संचलित जी.के.गुजर मेमोरिअल सह्याद्रि हॉस्पिटल, सातारा येथील कै.राधाबाई वाघोलीकर चॅरीटेबल ट्रस्ट संचलित वाघोलीकर आय क्‍लिनिक ऍण्ड फेको सेंटर, सातारा येथील लायन्स क्‍लब कॅम्प चॅरीटेबल ट्रस्ट संचलित लायन्स नॅब नेत्र रूग्णालय, कराड लायन्स चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्रीयुत रामकिसन लाहोटी नेत्र रूग्णालय,शिरवळ ता.खंडाळा येथील ज्ञान प्रबोधीनी मेडीकल ट्रस्ट पुणे संचलित श्रीमती कमला मेहता आय हॉस्पिटल, सातारा येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्ट संचलित सावकार होमिओपॅथिक रूग्णालय, मायणी ता.खटाव

छ.शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित रूरल इन्सि÷ट्‌युट ऑफ आयुर्वेद, रिसर्च सेंटर ऍण्ड हॉस्पिटल, गोंदवले ता.माण येथील श्री.सदगुरू ब्रम्हचैतन्य महाराज ट्रस्ट संचलित चैतन्य रूग्णालय, सातारा येथील कनिष्क ज्ञानपीठ व आरोग्य संस्था संचलित कनिष्का स्पेशालिटी हॉस्पिटल या नोंदणीकृत धर्मादाय रूग्णालयात निर्धन व दुर्बल रूग्णांना उपचार घेता येणार आहेत. मात्र, यापैकी 5 लाख रूपयांपेक्षा रूग्णालयाचे उत्पन्न कमी असेल तर त्या ठीकाणी उपचार घेता येणार नाहीत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत ट्रस्टच्या माध्यमातून रूग्णांसाठी देणग्या स्विकारणाऱ्या व आयकर सुविधा घेणाऱ्या रूग्णालयांची यादीची जमवा जमव सध्या सुरू आहे. लवकरच टप्प्या टप्प्याने ते ट्रस्ट व रूग्णालयांची शोधमोहिम घेण्यात येणार असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय रूग्णालयांनी निर्धन व दुर्बल रूग्णांना कायद्यानुसार मोफत, सवलतीने तसेच सन्माने उपचार देणे बंधनकारक आहे. रूग्णांनी कायदेशीर कागदपत्रे सादर करून देखील त्या रूग्णालयांनी उपचार दिले नाहीत तर रूग्णांनी अथवा नातेवाईकांनी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावेत. अर्जाची गांभिर्याने दखल घेवून संबधित रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल.
– आय.के.सुर्यवंशी
सहा.धर्मादाय आयुक्त, सातारा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)