धर्मादाय उप आयुक्त कार्यालयामध्ये अपंग,वृध्दांची दमछाक

इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याची मागणी, स्वच्छतागृहांची गैरसोय
महेश भोसले
नगर – धर्मादाय उपायुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे 1 वर्षापुर्वी 2017 साली गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर येथील नगर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर शुभारंभ वजा स्थलांतर झाले.नवीन जागेत स्थलांतर झाल्यामुळे या ठिकाणी कामकाजा निमित्त येणाऱ्या सर्वांनाचा दिलासा मिळाला. परंतु धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात दिवसेंदिवस येणाऱ्या अपंग व व्‌ृध्दांचा भ्रमनिरास होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे कारण म्हणजे कार्यालय या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे इमारतीचे जिने चढतांना उतरतांना अपंग व वृध्द व्यक्तींची अक्षरश दमछाक होतांना दिसते आहे.
धर्मादाय उपआयुक्त कार्यालया मध्ये 25 हजाराच्या वर विविध सामाजिक संस्था ,मंदिरे, प्रतिष्ठाण, शैक्षणिक संस्था आदींचे रजिस्ट्रेशन असून साधारणपणे अपंग व वृध्दांच्या 100 च्या वरती संस्था जिल्हयातून रजिस्टर आहेत. त्यामुळे येथे जिल्हयातील विविध तालुक्‍यातुन नवीन संस्था नोंदणी, बदल अर्ज, लेखा विवरण पत्र (ऑडिट ) ,तक्रार अर्ज, व संस्थेच्या इतर कामांबाबत नेहमीच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातुन काम करणारे, ज्येष्ठ पदाधिकारी व अपंग यांना सातत्याने कार्यालयात कामकाजासाठी यावे लागते. त्यामध्ये तीन मजले पायऱ्या चढून जाणे हे अपंगासाठी व वृध्दांसाठी जिकरीचे बनलेले असते. परंतु कार्यालयामध्ये कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी वारंवार यावेच लागते. कार्यालयामध्ये दररोज सरासरी 40 अपंग व वृध्द जिल्हयातून कामकाजासाठी येत असतांना आढळतात त्यातच वृध्द व्यक्तींना बऱ्याच वेळा मधुमेह, रक्तदाब अशा प्रकारचे आजारही असतात.अपंगांना शारीरिक व्यंगामुळे कुबडया ,व्हिलचेअर इत्यादीच्या साहाय्याने तिसऱ्या मजल्यापर्यंत जाणे जवळ जवळ अशक्‍यच असते. तसेच वृध्द व्यक्तींन ा वयोमानानुसार आजार असल्यामुळे आहेत त्या आजाराचे स्वरूप गंभीर होण्याचाही धोका मोठया प्रमाणावर असतो. तसेच तिसऱ्या मजल्यावर कोर्टाचे अधिकारी व कर्मचाऱ्यासांठीच फक्त स्वच्छतागृहे उपलब्ध असतात बऱ्याच वेळेस स्वच्छतागृहांच्या चाव्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडेच असल्यामुळे ही स्वच्छतागृहे कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सामान्या नागरिकांसाठी बंदच असतात. बऱ्याच वेळा संस्थांच्या कामासाठी महिन्यातुन बऱ्याच चकरा मारव्या लागतात. कार्यालयात येणाऱ्या सर्वच पक्षकारांना खाली व परत तीन मजले चढून वर जावे लागते. याबाबत नेहमीच प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. याबाबत अपंगांच्या संघटनेंच्या माध्यमातुन अपंग व वृध्दांचा त्रास कमी होण्यासाठी या कार्यालयातील इमारतीमध्ये लिफ्ट बसवावी ही मागणी कार्यालय सुरू झाल्यापासुन आहे. परंतु आजही त्यांची मागणी पुर्ण होत नसल्यामुळे वृध्दांचा व अपंगांचा भ्रमनिरास होत असल्याची भावना कार्यालयात येणाऱ्यांकडून व्यक्त होतांना दिसते.आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्राऊंड फ्लोअर पासुन इमारतीच्या मागच्या बाजुस लिफ्टची व्यवस्था करण्याची चर्चा असून स्वच्छतागृहे ही स्वच्छतेबाबत नियम लावून सर्वांसाठी वापरता येण्याच्या प्रयोजनाच्या चर्चा आहेत. मात्र या चर्चा फक्त चर्चा न राहता त्या प्रत्यक्षात सत्यात उतराव्या या आशाळभूत नजरेने या कार्यालयातील येणारे अपंग व वृध्द चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. आता त्यांचा भ्रमनिरास होऊ नये .हीच अपेक्षा

चोैकट प्रतिक्रिया
धर्मादाय उपआयुक्‍त कार्यालयात अपंगांच्या संस्था रजिस्टर आहेत. कार्यालयात मजले चढतांना दिव्यांग व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागते.याबाबत अपंगांचा व वृध्दांचा त्रास कमी होण्यासाठी इमारतीमध्ये लिफ्ट बसवावी व स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत यासाठी वारंवार निवेदन देऊनही अदयापर्यंत हा प्रश्‍न प्रलंबितच आहे. याबाबत ठोस उपाययोजना करून अपंगांना व वृध्दांना होणारा मानसिक व शारीरीक त्रास कमी करावा. हीच अपेक्षा याबाबत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे.
रत्नाकर ठाणगे
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अपंग सेल

वृध्द व अपंगांना सेवाभावी संस्थेच्या कामकाजा निमित्त नेहमीच कार्यालयात यावे लागते. बऱ्याच वेळेला वाढत्या वयोमाना मुळे विविध प्रकारचे आजार वृध्दांना होत असतात त्यातच पायऱ्या चढल्यामुळे व उतरल्यामुळे हे आजार बळावून गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे या अपंगांच्या व वृध्दांच्या या प्रश्‍नाबाबत गांभिर्याने विचार व्हावा. याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातुन संघर्ष करीत आहोत. हा प्रश्‍न गांभिर्याने घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून या कार्यालयात लिफ्ट बसविण्यासाठी सकारात्क विचार व्हावा.
संजय पुंड
प्रहार अपंग संघटना ,नगर तालुका उपाध्यक्ष


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)