धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये “झिरो पेन्डन्सी’ अभियान

पुणे, दि. 31 – राज्यात “झिरो पेन्डन्सी’ अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्येही 15 जानेवारीपासून “झिरो पेन्डन्सी’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये (15 ते 31 जानेवारी 2018) सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांचे सुमारे 10 हजार 656 विनावाद बदल अर्जांचा निपटारा करण्यात करण्यात आला आहे.

धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सामाजिक, शैक्षणीक वैद्यकीय व धार्मिक संस्थांचे बदल अर्ज वर्षानुवर्षे कार्यालयाकडे प्रलंबित होते. हे अर्ज निकाली काढण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सर्व कार्यालयामध्ये झिरो पेन्डन्सी मोहिम राबविण्याचे आदेश दिले. धर्मादाय कार्यालयाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती या आठ विभागांच्या सर्व जिल्हा कार्यालयात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मुंबई विभागात 2092, पुणे 2597, नागपूर 705, अमरावती 910, नाशिक 3876, कोल्हापूर 1417, औरंगाबाद 559 , लातूर 400 असे एकूण 10 हजार 656 बदल अर्ज निकाली काढण्यात आले असून, पुढील 15 दिवसांमध्ये उर्वरीत विनवादातीत बदल अर्जांचा निपटारा करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती पुणे विभागाचे धर्मादाय उपआयुक्त, शेखर गोडसे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जागताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)