धर्मांतर प्रकरण; ‘त्या’ महिलेविषयी 3 दिवसांत निर्णय घ्या – पाक न्यायालय

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर न्यायालयाने किरण बाला उर्फ आमना बीबीच्या अर्जावर 3 दिवसांत निर्णय घेण्याचा गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी नागरिकत्व आणि स्वतःच्या व्हिसाची मुदत वाढविण्याची विनंती करणाऱ्या किरण बालाच्या अर्जावर 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला जावा, असा निर्देश न्यायालयाने पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाला दिला आहे.

पंजाबच्या होशियारपूर येथील रहिवासी शीखधर्मीय किरण बाला 12 एप्रिल रोजी शीख भाविकांच्या दलात सामील होत अटारी येथून विशेष रेल्वेने पाकिस्तानातील पंजा साहिब येथे गेली होती. पाकिस्तानात पोहोचल्यावर तिने फेसबुकमित्र मोहम्मद आझमच्या मदतीने लाहोरच्या जामा मशिदीत इस्लाम धर्म स्वीकारला. तेथेच विवाह केल्यावर तिने आमना बीबी हे नवे नाव धारण केले होते.किरण हिने इस्लामाबाद येथील पाकिस्तानच्या विदेश विभागाच्या कार्यालयात अर्ज दाखल केल्यावर तिच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार समजला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)