धर्मांतरांनंतरही मालमत्तेवर मुलीचा अधिकार

पाल्याने धर्मांतर केल्यानंतर पित्याच्या मालमत्तेवरील त्याचा अधिकार संपत नाही. कारण धर्मांतराचा विषय हा ऐच्छिक मानला जातो आणि त्यामुळे नातेसंबंधात बदल होत नाही. अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय देत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.

न्यायालयाने म्हटले की, एखाद्याने हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी तो पित्याच्या मालमत्तेवर अधिकार राखू शकतो. अर्थात पित्याने मृत्यूपत्र करून ठेवलेले नसावे. एका हिंदू भावाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला होता.

भावाच्या मते, तिच्या बहिणीने धर्म परिवर्तन केल्याने पित्याच्या मालमत्तेवर अधिकार संपला आहे. आता तो हिंदू उत्तराधिकार अधिनियमानुसार पित्याने खरेदी केलेल्या फ्लॅटवर आपला अधिकार सांगू शकत नाही. या प्रकरणावर न्यायालयाने विचार केल्यानंतर म्हटले की, कोणत्याही धर्माला सोडणे किंवा अंगिकारणे ही बाब ऐच्छिक असते, तर उत्तराधिकाराचा हक्क हा जन्मानेच मिळत असतो. त्यामुळे केवळ धर्म बदलला म्हणून एखाद्याचे नाते किंवा जन्माने मिळालेला अधिकार संपत नाही.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, जगात बहुतांशी नागरिकांसाठी धर्म हा एक जीवनाचा मार्ग आहे. आपल्या घटनेत धर्मनिरपक्षतेचा देखील उल्लेख आहे. त्याचबरोबर घटनेत धर्म स्वीकारणे किंवा सोडणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. म्हणूक केवळ धर्म बदलला म्हणून मुलीला पित्याच्या मालमत्तेतील वाटा देण्यात अपात्र ठरवता येत नाही.

प्रसाद पाटील 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)