धर्मवीर प्रतिष्ठानमुळे कबड्डीला गतवैभव : मनोज पवार

शिरवळ : कबड्डी स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी मनोज पवार, शेजारी दत्तानाना ढमाळ, उदय कबुले, राजेंद्र तांबे, दिलीप गुंजवटे, दीपाली साळुंखे, आदेश भापकर आदी.

शिरवळ, दि.14 (वार्ताहर) – शिरवळ, ता. खंडाळा येथील धर्मवीर संभाजी कला व क्रीडा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिष्ठानने कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार यांनी केले.
शिरवळ, ता. खंडाळा येथे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आंतरशालेय आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, लोणंद बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, जि. प. सदस्य उदय कबुले, दीपाली साळुंखे, खंडाळा पंचायत समिती सदस्य अश्विनी पवार, शोभा जाधव, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, उपसरपंच दिलीप गुंजवटे, माजी उपसरपंच आदेश भापकर, राष्ट्रवादीचे शिरवळ शहराध्यक्ष चंद्रकांत मगर, ग्रा. पं. सदस्य सचिन राऊत, राधिका बेलापूरकर, मंगल निगडे, ममता पिसाळ, आशा कारळे, रिजवान काझी, फिनोलेक्‍स जे-पॉवरचे सरव्यवस्थापक सदानंद पोसे, रवी दुधगावकर, तात्या पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अजय भोसले उपस्थित होते.
मनोज पवार म्हणाले, धर्मवीर संभाजी कला व क्रिडा प्रतिष्ठानने खेळाडू घडविण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहावे.
दत्तानाना ढमाळ, उदय कबुले, राजेंद्र तांबे, दिलीप गुंजवटे यांनी मनोगत व्यक्त केले. बळीराम कुचेकर यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल तांबे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)