धर्मवीर पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

मंचर-आंबेगाव तालुका बजरंग दलाच्या वतीने समाजसेवक गोटुशेठ भंडारी यांच्यासह इतरांना धर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे प्रमुख सुहास बाणखेले, संतोष खामकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बजरंग दल दुर्गावाहिनी आंबेगाव तालुका आयोजित शोभायात्रेचे मंचर शहरात आयोजन करण्यात आले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून या शोभायात्रेने नावलौकिक मिळवला आहे. दरवर्षी या शोभायात्रेत सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या काही विशेष अतिथींचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार सन्मान करण्यात येतो. यात साध्वी प्राची दीदी यांना धर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यात्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या हभप पांडुरंगमहाराज येवले त्याचबरोबर आपण आपल्या समाजाचे देणे लागतो याची जाण ठेवून समाजात भरीव कामगिरी करणारे सरपंच दत्ता गांजाळे, परिधान रेडीमेडचे मालक आणि समाजसेवक गोटूशेठ भंडारी, पप्पूशेठ थोरात, मोहन गावडे, उद्योजक गोविंद खिल्लारी, गणेशमहाराज भोर, भीमाशंकर देवस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश कौदरे आणि घोडनदीत वाहून जाणारे आजीचे प्राण वाचवणले याबद्दल विशेष शौर्य पुरस्काराने संजय शिंदे यांचा विशेष सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)