धरणे ओव्हर फ्लो

पुणे-गेले काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून अनेक धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.त्याचबरोबर सोलापूर शहरासाठी वरदान असलेले उजनी धरण सुध्दा 78 टक्के भरले आहे.
गेले दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे.जिल्ह्यात ही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नव्वंद टक्के धरणे ही पुर्ण भरली असून त्यातून विसर्ग ही सुरु करण्यात आला आहे.त्याचबरोबर जी काही धरणे अद्याप भरलेली नाही ती सुध्दा लवकरच भरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे त्यातून कधीही विसर्ग सुरु केला जाऊ शकतो असे सिंचन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील खडकवासला,पानशेत,मुळशी,पवना,कासारसाई,डिंभे,वडीवळे,घोड,भामा-आसखेड,आंध्र या धरणांमधून विसर्ग सुरु आहे.त्यात सर्वाधिक विसर्ग हा मुळशी मधून सुरु आहे.मुळशी धरणातून सध्या 8 हजार क्‍युसेक्‍स ने पाणी सोडण्यात येत आहे.पावसाचा जोर वाढवल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.खडकवासला धरणातून सुध्दा रात्री उशीरा पर्यत चार हजार क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यात येत होते त्याचबरोबर पानशेत धरणातून 900 क्‍यसेक्‍सचा विसर्ग सुरु आहे.हे सर्व पाणी उजनी धरणात मिळत असल्याने या धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.आज संध्याकाळ पर्यत या धरणामध्ये 42 टीएमसी पाणी साठा जमा झाला होता.टक्केवारी मध्ये हे धरण सुमारे 78 टक्के भरले आहे.

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)