उजनी धरणाने शंभरी ओलांडली…

101.56 टक्के एवढा पाणीसाठा ः आता गरज योग्य नियोजनाची
इंदापूर – हा.. हा… म्हणता उजनी धरण आज सकाळीच 100 टक्के भरले आहे. उजनी धरणात आज रोजी 101.56 टक्के एवढा पाणीसाठा झाल्याने सोलापूर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. गेली आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे 100 टक्‍क्‍यांच्या आसपास भरली असल्याने या धरणांमधून नदी तसेच कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

25 ऑगस्टला अवघा 67 टक्के साठा असलेल्या धरणात अवघ्या पाचच दिवसांत 34 टक्‍क्‍यांनी वाढ होत पाणी पातळीने शंभरी ओलांडली.

दरम्यान धरण 100 टक्के भरले असले तरी आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नाहीतर उन्हाळ्यात नागरिकांवर पाणी…पाणी… करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)