धरणातील पाणी राखून ठेवण्यासंदर्भात बैठक लावा आ. शंभूराज यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

काळगाव – पाटण तालुक्‍यातील 110 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील गतवर्षीपेक्षा घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता या धरणातील पाणी हे माहे जून महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामध्ये उभ्या असणारी उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवावे, यासंदर्भात योग्य नियोजन होण्यासाठी आपण जलसंपदा राज्यमंत्री म्हणून संबधित सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजीत करावी, अशी मागणी आ. शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.

जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांना आ. शंभूराज देसाई यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे की, पाटण तालुक्‍यात राज्य शासनाने 110 गांवामध्ये दुष्काळ जाहीर केला असून तालुक्‍यातील कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे. सध्या धरण परिसर सोडला तर दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची पाणीटंचाई भासू लागली आहे. धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रे आत्तापासूनच कोरडी पडू लागली आहेत.

जून महिन्यांपर्यत हीच परिस्थिती राहिली तर शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाणी राखून ठेवणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर संबधित सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजीत करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)