जिल्ह्यातील धरणांना प्रतिक्षा दमदार पावसाची

पुणे-गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. अनेक धरणांमध्ये 80 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला पण गेल्या काही दिवसांपासून घाट माथ्यावर ही पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक धरणांमधील विसर्ग ही थांबविण्यात आला आहे.त्यामुळे आता या धरणांना प्रतिक्षा आहे ती पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरु होण्याची

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील खडकवासला, चासकमान,डिंभे,पानशेत,मुळशी,पवना ही धरणे नव्वद टक्‍यांहून अधिक भरल्याने त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला होता.त्यावेळी चासकमान धरणातून सर्वाधिक म्हणजे तब्बल 25 हजार क्‍युसेक्‍स ने पाणी सोडण्यात येत होते.त्याखालोखाल खडकवासला धरणातून 10 हजार क्‍युसेक्‍स ने पाणी सोडण्यात येत होते,त्याचबरोबर पवना मुळशी आणि डिंभे या धरणांमधूनही विसर्ग सुरु होता .जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेले पाणी उजनी मध्ये जमा होत असल्याने त्याचा फायदा उजनी धरणाला झाला होता आणि उजनी धरण सुध्दा आज तब्बल पन्नास टक्‍याच्या जवळपास भरले आहे.

जुलै महिन्यानंतर पावसाने घेतली विश्रांती आजपर्यत कायम आहे.त्यामुळे बहुतांशी धरणांमधील विसर्ग आता थांबविण्यात आला आहे.सध्या फक्त मुळशी धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग सुध्दा आज(रविवारी) दुपारनंतर सुरु करण्यात आला.तोही सात हजार क्‍युसेक्‍सने सुरु आहे.मुळशी धरण हे 99.21 टक्के भरल्याने त्यातील साठा थोडा कमी करण्याच्या उद्देषाने हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.अन्य कुठल्याही धरणामधून सध्या विसर्ग सुरु करण्यात आले नाही.कारण धरणांच्या परिसरातही कुठेही सध्या पाऊस पडत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
खडकवासला धरण क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे.

या खडकवासला साखळी धरणांमधील पानशेत हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे उर्वरित वरसगाव धरण हे 83 टक्के तर टेमघर धरण हे 44 टक्के भरले आहे.खडकवासला धरणातून सध्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.सध्या या चारही धरणांमध्ये मिळून 24.81 टीएमसी पाणी साठा जमा झाला असून त्याची टक्केवारी ही 85 .11 टक्के इतकी आहे.गेल्या वर्षी या तारखेला या चार ही धरणांमध्ये मिळून 28.48 टीएमसी पाणीसाठा होता तर 97.68 टक्के इतकी टक्केवारी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)