धरणसाखळी पुन्हा “ओव्हरफ्लो’

संग्रहित छायाचित्र

प्रमुख सर्व धरणांतून विसर्ग : “उजनी’ 95 टक्‍क्‍यांवर 

पुणे – मागील आठ दिवसांपासून धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे 100 टक्के भरली आहेत. तर पुणे जिल्ह्यातही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील चारही धरणे “फुल्ल’ झाली आहेत. त्यामुळे या धरणातून विसर्ग सुरू आहे. सध्या 18 धरणांमधून विसर्ग सुरू असून, खडकवासला धरणातून रविवारी (दि. 26) रात्री उशिरापर्यंत 18 हजार 491 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धरणसाखळीतील टेमघर धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वरसगांव आणि पानशेत येथे प्रत्येकी 26 मिमि पाऊस झाला असून, खडकवासला येथे 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अन्य धरणक्षेत्रामध्ये मुळशी येथे 56, नीरा देवधर 55, गुंजवणी 30, वडीवळे 47, पवना 48, आंद्रा 28, भामा आसखेड 19, माणिकडोह 11, कळमोडी येथे 20 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, 18 धरणातून विसर्ग सुरू असून, त्यातील डिंभे धरणातून 2 हजार 742, घोड धरणातून 3 हजार 420, मुळशीतून 6 हजार 155, चासकमान 2 हजार 100, पानशेत 2 हजार 931, वीर 13 हजार 872, भाटघर 4 हजार 578, निरा देवधर 5 हजार, गुंजवणी 1 हजार तर वरसगांव धरणातून 2 हजार 664 क्‍युसकने विसर्ग सुरू आहे.

भिमा खोरे प्रकल्पातील बहुतांश धरणे 100 टक्के भरली आहेत. तसेच पावसाचा जोर असाच राहिला तर विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. खडकवासला आणि वीर आणि भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असून, विसर्ग वाढला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)