धरणसाखळीतून पुन्हा विसर्ग

संग्रहित छायाचित्र

चारही धरणांमध्ये 95 टक्के पाणीसाठा

पुणे – खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पानशेत तसेच वरसगाव धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 1712 क्‍यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता हा विसर्ग 9 हजार 416 क्‍यूसेक करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, या धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांचा पाणीसाठी सोमवारी सायंकाळी 95.44 टक्के झाला आहे.

मागील आठवड्यापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्याने आसपासचे नदी, ओढे, नाले तसेच इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी धरणात येत आहे. या धरणांमधील पानशेत धरण 100 टक्के भरले असून त्यातून 3908 क्‍यूसेक तर वरसगाव धरणातूनही 4441 क्‍यूसेक पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे. या दोन्ही धरणांचे पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तसेच खडकवासला धरणही 100 टक्के भरले असल्याने सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी, पाऊस वाढल्यास पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)