धरणग्रस्तांनी बुधवारी पुन्हा काम बंद पाडले

ढेबवाडी – धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनाने मंत्रालयात बैठक लावून त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी धरणग्रस्तांनी मंगळवारी काम बंद पाडले. याबाबत तातडीने दखल न घेतल्यास पाण्यात उतरुन आंदोलन करु, असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस बंदोबस्तात धरणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु दुपारनंतर पुन्हा वांग मराठवाडी कृती समितीने अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली धरणग्रस्तांनी काम बंद पाडले.

धरणग्रस्त कृतीसमितीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसापूर्वीच या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास विविध गावातून धरणग्रस्त घोषणा देत धरणस्थळावर जमा झाले. माती वाहणारे डंपर अडवत त्यांनी ठिय्या मांडला. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या होत नाहीत, तोपर्यंत काम सुरु करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, एस. टी. सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)